पंडित मिश्रा यांचे पालकांना आवाहन पॅकेज पाहू नका तर मुलीला आनंदी ठेवणारा वर शोधा
सध्याचा काळ बिकट झाला आहे पालक आपल्या मुलीसाठी वर शोधताना मुलाला किती पॅकेज आहे, तो किती धनवान आहे. हे सर्व पाहिले जाते. मात्र, धनवान असतानाही अनेकदा मुलाच्या व्यसनांमुळे मुलीचे आयुष्य खराब होते. त्यामुळे आपल्या मुलींसाठी वर शोधताना केवळ पॅकेज पाहू नका, तर तो मुलगा आपल्या मुलीचा सन्मान आणि आदर करतो का? हे पहा असे आवाहन पंडित मिश्रा यांनी पालकवर्गाला केले आहे.
जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे आयोजीत शिवमहापुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी देखील जिल्हाभरातील लाखो भाविकांनी कथेच्या ठिकाणी हजेरी लावली.
शिवमहापुराण कथेसोबतच काही समाजप्रबोधनाचे दाखले देखील पंडीत मिश्रा यांनी आपल्या प्रवचनातून दिले.